उड्डाणपुलावरून ट्रक थेट कारवर कोसळला… भीषण अपघात कारमधील चार प्रवासी जखमी…

0
8

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):- 

माणगाव टेंपपाले येथे दोन वाहनांचा भीषण अपघात होऊन ट्रक उड्डाणपुलावरून कारवर कोसळला…यामध्ये चारजण जखमी झाले आहेत…मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार माणगांव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील टेमपाले गावाजवळ उड्डाण पुलावर ५ जून रोजी सकाळी सुमारे ८ वाजता एक भीषण अपघात झाला. महाडहून माणगांवकडे येणारा ट्रक क्रमांक MH12 HD 3833 नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या कार क्रमांक MH08 ON 6787वर आदळला आणि ट्रक थेट कारवर कोसळला.

सुदैवाने दोन्ही वाहने उड्डाणपुलावरून खाली कोसळण्यापासून बचावली, मात्र या अपघातात कारमधील चारजण जखमी झाले. यामध्ये जखमी असलेले प्रवासी धनंजय चंद्रभान चौधरी, साहील धमेद्र कुमार गुप्ता , संजय चंद्रभान चौधरी, रा. वडाळा, मुंबई तर ट्रक चालक चंद्रकांत रामदास लडकत  रा. ढुमेवाडी, जि. पुणे सदर संजय चौधरी यांनी ट्रकचालक चंद्रकांत लडकत यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली. सर्व जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.