रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक दृष्ट्या आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे. पाली सुधागड तालुक्यातही भाजपने पक्ष वाढीच्या दृष्टीने मुसंडी मारली असून दैनंदिन होणाऱ्या पक्ष प्रवेशाने भाजपला मोठी ताकत व उभारी मिळते आहे. तालुक्यातील सामाजिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या रासळ ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच,सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. सुधागडात भाजपची जोरदार मुसंडी पहावयास मिळत असून पाच्छापूर ग्रामपंचायत पाठोपाठ रासळ ग्रामपंचायत ही भाजपमध्ये विलीन झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रवेशकर्त्यांचे खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, प्रकाशभाऊ देसाई, गीताताई पालरेचा, राजेश मपारा, श्रीकांत ठोंबरे, नरेश खाडे , प्रणाली शेठ आदींनी भाजपात जोरदार स्वागत केले. युवा सक्षम नेते नरेश खाडे व अन्य वरिष्ठ पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना यश येऊन रासळ ग्रामपंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचे बोलले जात आहे. या पक्ष प्रवेशात ग्रामविकास परिवर्तन आधाडीच्या रासळ ग्रामपंचायत सरपंच प्रणिता प्रवीण खाडे,सदस्य नेहा रोहिदास खाडे,सदस्य ताई लक्ष्मण वाघमारे, संपदा शिरीष मांढरे (भाजप), दर्शन चिमण मोरे (भाजप), तसेच कार्यकर्ते प्रवीण खाडे, दीपक खाडे,सुरेश खाडे, श्रीधर खाडे,नितीन देसाई, किशोर मोरे,कैलास दळवी, सचिन खाडे, निलेश लहाने, सागर खाडे, सुधीर खाडे, शेखर सुखदरे, विजय जाधव, विनोद वाघमारे, अरुण खाडे, नितीन जाधव, शरद खाडे, सुरेश दळवी, मंगेश म्हसके, जनार्दन दळवी, चंद्रकांत म्हसके, दिलीप सुखदरे, चंद्रकांत जाधव, रामदास मोरे, रोहिदास खाडे, शिरीष मांढरे, सुनील दळवी, वामन खाडे, दशरथ सावंत, योगेश भौड, सटूराम दळवी, संतोष भौड,आदींसह कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.