रायगड जिल्ह्यात पुढचे ३ ते ४ तास पाऊस घालणार धुमाकूळ… रायगड जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट…

0
34

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

मान्सूनने कोकणचा संपूर्ण भाग व्यापला असून महाराष्ट्रातील काही भाग मान्सूनची एन्ट्री झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील तीन तासांसाठी  रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे…पुढील काही तास चारही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.अतिवृष्टीमुळे माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजिवन विस्कळीत झाले…रायगड जिल्ह्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे… रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात मुसळधार पावासाने हजेरी लावली.अनेक ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः दक्षिण रायगड आणि मुरुड तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे.अलिबाग, रोहा, माणगाव आणि महाड तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे… श्रीवर्धन, म्हसळा, माथेरान, रोहा आणि सुधागड तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे…या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून,काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.