महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-
रायगड भूमीत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न श्री.भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कृषी महाविद्यालय मोहोप्रे-आचळोली (महाड) येथील कृषिदूतांनी कोळोसे गावात ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले… शेतकऱ्यांनी ही बीज प्रक्रिया कशी व का करावी या संदर्भात कृषिदूतांनी संपूर्ण माहिती दिली त्याचबरोबर बियाण्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी बीज प्रक्रिया कशी उपयोगी आहे हे पटवून सांगितले… यावेळी शेतकऱ्यांना रासायनिक व जैविक खतासह बीज प्रक्रिया करून दाखवली… शेतकरी नक्कीच या प्रात्यक्षिकांचा अवलंब करतील व आपल्या शेतामध्ये उत्तम प्रकारचं व निरोगी बियाणे तयार करतील असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला… यावेळी कोळोसे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते…
कृषी महाविद्यालय मोहोप्रे-आचळोलीचे प्राचार्य डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापिका व्ही.आर. पवार, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस. एस. संकपाळ, विषय तज्ञ व्ही. ए. घुले व एस. एफ. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविले… कृषी महाविद्यालय मोहोप्रे- आचळोली येथील कृषिदूतांमध्ये कु. रामचंद्र ठणके, कु.रोहन चव्हाण , कु.विपुल हगवणे, कु. प्रतिक जाधव, कु. युवराज सूर्यवंशी, कु.गौरव विश्वकर्मा, कु.मानव पाटील, कु.समीर न्हावेलकर यांचा समावेश आहे….