महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावाजवळ पीडिलाईट कंपनीने कंट्रक्शन करण्याकरिता इस्कॉन कंपनीकडून कॉलनी उभारली आहे…त्या कॉलनीमध्ये ठेकेदाराने कामासाठी आणलेले कामगार यांना दहा शौचालयाची उभारणी केली आहे. शौचालयाचे घाणेरडे पाणी आजूबाजच्या शेतीत सोडले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य तयार झाले आहे…त्यात अन्न साठवून अन्नाचा कचऱ्याचा गोळा एका ड्रमात ठेवला आहे…यामुळे अधिक तीव्र अशी दुर्गंधी देशमुख गावात पसरली असून डेंगू, मलेरिया अशा अनेक रोगांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्यात बिघाड होऊ शकतो…इस्कॉन कंपनीच्या या दुर्गंधीकडे ग्रामपंचायत देशमुख कांबळे ग्रामस्थ, सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य विभाग अधिकारी यांनी पाहणी केली…तरीही ग्रामपंचायत देशमुख कांबळे यावर कोणतीही ठोस पाऊल उचलत नाही…देशमुख कांबळे येथिल नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या इस्कॉन कंट्रक्शन कंपनीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा ही कॉलनी त्वरित बंद करावी अशी मागणी समाजसेवक टी एस देशमुख यांनी केली आहे