उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
दि. २८ जून २०२७ रोजी चाणजे ग्रामपंचायत कार्यालय करंजा, तालुका उरण येथे करंजा गावांतील सात पाडे व ग्रामपंचायत हद्दीतील बाधित शेतकरी व मच्छीमार यांची करंजा रेवस रेड्डी महामार्गावरील पुलाचे सुरू केलेले काम ग्रामस्थ व महिलांनी बंद पाडले आहे…. ते काम सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून तहसीलदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी, MSRDS चे चिफ इंजिनिअर यांच्या उपस्थितीत होते…. त्यांच्या आग्रहास्तव सरपंच श्री. अजय म्हात्रे यांनी मिटिंग बोलावली होती… यावेळी उपसरपंच श्रीमती कल्पना पाटील, माजी सभापती ॲड. सागर कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम नाखवा, ॲड. वेदांत नाखवा, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष तसेच ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते… सरपंचासह सर्वजण अगोदर बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नंतरच काम सुरू करू यावर ठाम राहिले… यावेळी कोणताही सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही, त्यामुळे तहसीलदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मिटींग आटोपती घेतली…. शेवटी सरपंचानी आवाहन केले की, आपली अशीच एकजूट कायम ठेऊन अन्याय विरोधात लढा आणखी तिव्र करुन आपल्या न्याय हक्कांसाठी लढत राहू अशी भावनिक आवाहन केले…