उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण तालुक्यातील श्रीमंत असलेली भेंडखळ ग्रामपंचायतील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून स्मशानभूमीचे पत्रे सडले असुन काही पत्रे पावसाळ्यात जोरदार पावसाने उडाले आहेत.स्मशानभूमीच्या कंपाऊंड,लोखंडी गेटची देखील दुरावस्था झाली आहे.
स्मशानभूमीला झाडे, झुडूपे यांनी वेडा घातला आहे.तसेच स्मशानभूमीतील लाकडाचे गोडाऊनचे शटर मोडकळीस आले आहे.याबाबत भेंडखळ गावातील समाजसेवक शिवाजी यशवंत ठाकूर यांनी दिनांक २० जुन रोजी ग्रामपंचायत प्रशासनसला स्मशानभूमी दुरावस्थ बाबत लेखी पत्र देऊन दखल घेतलेली नाही.पावसाळ्यात स्मशानभूमीत अंत्यसंस्कार साठी येणारे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.अत्यविधी भरपावसाळयात भिजत उरकावे लागत आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनसह सत्ताधारी आणि विरोधकाचे दुर्लश होत आहे.तरी स्मशानभूमीची त्वरीत दुरुस्ती,डागडुजी करावी अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे समाजसेवक शिवाजी ठाकूर यांनी केली आहे…