कंपनीच्या पार्टीकरिता आले अन् दारूच्या नशेत घडला अतिप्रसंग… अलिबाग तालुक्यातील घटना…

0
36

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-

मुंबईतून पार्टीसाठी आलेल्या एका महिलेवर मद्याच्या नशेत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी अभिषेक सावडेकर ( वय-२५ वर्षे रा. कोपरखैरणे, वाशी नवी मुंबई, ठाणे) याच्याविरोधात पीडित महिलेने अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे….

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथील एका कंपनीचे काही अधिकारी कर्मचारी असे चौदा जणांचा समुह ३० जून २०२५ रोजी ऑफिस पार्टी असल्याने चौदा जणांचा समुह सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भाऊचा धक्का येथून बोटीने मांडवा येथे आले…. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील मुशेत येथे असणाऱ्या अलास्का व्हिला येथे सर्वजण पोहचले….  त्यावेळी पीडित महिलेच्या ऑफिसमधील अधिकारी कर्मचारी यांची पार्टी सुरू होती….  त्यावेळी सर्वजण मद्यपान करीत होते… महिना अखेर असल्याने पीडित महिलेच्या बॉसने ऑफिस मधील कर्मचारी यांच्या पगार बिलाचे काम करण्यास सांगितले आणि काम पूर्ण झाल्यानंतर पार्टीमध्ये सहभागी होण्याची सूचना दिली…. पीडित महिलेने रात्री साडेआठ वाजता पगार बिलाचे काम संपवून इतर सहकारी यांच्या सोबत पार्टीमध्ये सहभागी झाली…. सदर पार्टीमध्ये पीडित महिलेने सहकारी यांच्यासमवेत मद्यपान केले…. मद्यपान जास्त झाल्याने पीडित महिला ही व्हिलामधे असणाऱ्या जलतरण तलाव नजिक झोपली… त्यानंतर पीडित महिलेस तेथुन तिच्या सहका-यांनी उचलून बेडरूम मध्ये नेऊन झोपवले…. त्यानंतर सदर मद्यपान नशेत असणाऱ्या पीडित महिलेस तिच्या सहकाऱ्यांनी आधार देत व्हिलामधील बेडरूममध्ये नेवून सोडले…. दिनांक १ जुलै २०२५ रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान पीडित महिलेस आपल्यावर कोणीतरी जबरदस्ती करीत असल्याची जाणीव झाल्याने पीडित महिलेस जाग आल्याने तिने पाहिले… त्यावेळी पीडित महिलेच्या कंपनीमध्ये कंपनीचा सेल्स एक्झकेटिव्ह या पदावर काम करणारा अभिषेक सावडेकर हा रूम मधून बाहेर जाताना दिसला… त्यावेळी पीडित महिलेच्या लक्षात आले की, अभिषेक सावडेकर याने पीडित महिला ही दारूच्या नशेत असल्याने त्याचा फायदा घेत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत…. त्यानंतर पीडित महिला माझ्या रूमच्या बाहेर येवुन पाहिले असता तेथे माझ्या कंपनीमध्ये काम करणारे आयुष ठक्कर व जसपाल सिंग हे पीडित महिलेच्या रूमच्या बाहेर होते त्यावेळी पीडित महिलेने त्यांच्याकडे चौकशी केली असता ते त्यावेळी तेथे नसल्याचे सांगितले व काय प्रकार झाला हा त्यांना माहीती नसल्याचे सांगितले…. त्यानंतर पीडित महीला आरोपी अभिषेक याच्याकडे चौकशी करणेकरिता गेले असता त्याने त्याचा रूम बंद करून झोपला होता… सकाळी अकरा वाजता तो उठल्यानंतर त्याच्याकडे परत चौकशी केली असता त्याने घाबरून जावुन पीडित महिलेची माफी मागितली… झालेल्या प्रकरणानंतर पिडीत महिला ही विरार येथे निघून गेली होती…..

याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गु.र.नं.११६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ६४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास अलिबाग पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलिस निरीक्षक सरिता मुसळे या करीत आहेत….