धेरंड पेझारी गावी जयंत पाटील यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा… हृदय सत्काराने जयंत पाटील भारावले…

0
14

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, सरचिटणीस, माजी आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस धेरंड (पेझारी )या मूळगावी अत्यंत धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी जयंत पाटील यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना या सत्काराने आपण भारावून गेलो असल्याचे म्हटले. नव्याने प्रकल्प येऊ घातले असताना एकाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. धेरंड शहापूर विभागातील शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आपण एक ग्रामस्थ म्हणून तुमच्या कायम पाठीशी उभा असून या मुद्द्यावर ताकतीने लढा असल्याचे जयंत पाटील म्हणाले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रियाताई पाटील व अन्य शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.