खड्ड्यामध्ये बुडून मयत झालेल्या मुलांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा… अनधिकृत माती उत्खनन केलेल्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी…

0
15

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

पेण तालुक्यातील बेणसे येथील तीन मुले पाण्यात बुडून मयत झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 20 जून रोजी घडली होती…. जुहेब जाकीर अत्तार वय १७ वर्षे, मिजान जाकीर अत्तार वय १३ वर्षे हे दोन सख्खे भाऊ आणि अशफाक अशरफ अन्सारी वय १७ वर्षे असे मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत….

सदरची मुले गावाशेजारी असलेल्या शेतावर जात असताना १५ फूट खोल अनधिकृत नव्याने खोदकाम केलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू पावल्याने एकच खळबळ उडाली… सदरची जागा खोदकाम करताना रॉयलटी भरली आहे का? किंवा १५ फूट शेतजमीन खोदण्याचा अधिकार ठेकेदारास किंवा संबंधित व्यक्तीस आहे का? जर उत्खनन करण्याची परवानगीच नसेल तर मौजे बेणसे ग्रामपंचायत बेणसे येथील सजा तलाठी बेणसे यांनी उत्खनन का थांबवले नाही? असा सवाल तेथील संतप्त नागरिक करीत आहेत….

सदर कोणी व्यक्तीने शेतकऱ्याची फसवणून करून आणि शासनाचा कर चुकवून अनधिकृत उत्तखन केले आहे, या बेजबाबदार व्यक्तीमुळे आज तीन तरुणांचा जीव गेल्याने या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीस कठोरात कठोर शिक्षा करून आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा, असे निवेदन पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांना दिले आहे…

सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे… संबंधित व्यक्तीने किती अधिकृत उत्तखन केले आहे, त्याने प्रशासनाची कशी फसवणूक केली आहे? याची माहिती समोर आली पाहिजे तसेच या मयत झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना भरपाई देऊन न्याय द्यावा, असे शिवसेना उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे यांनी बोलताना सांगितले….

या संदर्भात पेण तहसीलदारांशी चर्चा केली असता संबंधित खोदकाम केलेल्या व्यक्तीला नोटीस देऊन योग्य सुनावणी आणि सखोल चौकशी करून संबंधित दोषी असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले….