रायगड शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
रायगड स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नियुक्ती श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून झाली आहे…. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेमध्ये आपल्या कार्यकाळात अनेक गुन्हे उघडकीस आणून महत्वाची भूमिका बजावली….
त्यांच्या या बदलीनंतर रायगड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेमध्ये नव्या जबाबदाऱ्या आणि नवीन रणनीतींचा आरंभ होणार असल्याचे संकेत दिले आहेत…. श्रीवर्धन येथे त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे….