चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-
खालापूर नगर पंचायत हद्दीतील दांडवाडी येथे दारूबंदीसाठी आज महीलांनी निवेदन दिले…. खालापूर तालुक्यातील खालापूर नगर पंचायत हद्दीतील मौजे दांडवाडी येथे अवैद्य दारू विक्री होते, असा आरोप तेथील महिला मंडळ यांनी केला असून, दारू विक्रेते यांच्यापासून स्थानिक ग्रामस्थ यांना त्रास होत आहे… त्यामुळे गावातील शांतता भंग होत असते… काम, नोकरी, व्यवसाय करणारे सामान्य नागरिक येथे शांततेत राहत आहेत त्यामुळे येथे सामाजिक सलोखा राखण्यास मदत होत आहे, पण अवैद्य दारू विक्री करणारे यांच्यापासून त्रास होत असल्याचा आरोप महिला मंडळ यांनी करून खालापूर पोलिस यांना निवेदन दिले….