नांदगाव-मनमाडच्या जनतेसाठी जलक्रांती… गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न सुटण्याच्या मार्गी…

0
6

नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-

नांदगाव व मनमाड शहरातील लाखो नागरिकांनी पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी अनेक वर्षे तडफड केली. या पाणी प्रश्नावर अनेकांनी फक्त राजकारण केले, परंतु कोणतीही ठोस उपाययोजना झाली नव्हती. मात्र आता, आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या दूरदृष्टी व सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याच्या दिशेने गेला आहे.
मुंबई येथे आमदार सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत, गिरणा व करजगव्हाण पाणीपुरवठा योजनांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.ठेकेदारांनी स्पष्ट केले की, पाणीपुरवठा योजनेचे काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे.या बैठकीतील ठळक मुद्दे:

योजनेच्या तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा,निधी व्यवस्थापन, अंमलबजावणीतील अडचणींवर उपाययोजना,संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याचे आदेश,पाणीपुरवठ्याच्या दर्जावर आणि वेळेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर,
नांदगाव आणि मनमाड शहरातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळवून देणे हे माझे सर्वोच्च कर्तव्य आहे. नागरिकांचे हक्क डावलले जाणार नाहीत. कोणताही अडथळा खपवून घेतला जाणार नाही. पाणी ही मूलभूत गरज आहे आणि ती पूर्ण करणे ही माझी जबाबदारी आहे.”

गेल्या अनेक दशकांत पाणी हा एक निवडणुकीचा मुद्दा राहिला. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी पाणी योजना प्रत्यक्षात आणल्या नाहीत.सुहास कांदे यांनी या मुद्द्यावर केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष काम करून दाखवले आहे.माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून, आमदार कांदे यांनी दोन्ही योजना मंजूर करून घेतल्या. आता या योजनांमुळे नांदगाव व मनमाडच्या लोकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची गरज राहणार नाही… ही योजना म्हणजे केवळ विकासाचा भाग नाही, तर जनतेच्या आरोग्य, सन्मान आणि हक्काचा प्रश्न आहे.नांदगाव व मनमाडकरांसाठी ही जलक्रांती ठरणार असून, विकासाच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले गेले आहे.