मालेगावमध्ये ४० किलो गांजा पकडला… छावणी पोलिस निरीक्षक दीपक जाधव,पोलिसांची मोठी कारवाई…

0
9

नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-

मालेगाव शहरात छावणी पोलिसांनी केलेली कारवाई सध्या चांगलीच चर्चेत आहे…४० किलो गांजा आणि चारचाकी वाहन जप्त करून मुंबईतील महिला आरोपीसह तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.अमली पदार्थांच्या विरोधात ही यंदाची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, संपूर्ण मालेगाव शहरात यानंतर खळबळ उडाली आहे.पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती की, एक चारचाकी वाहन शिरपूरहून गांजा घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार आहे.त्यानुसार त्यांनी पोलीस फौजफाटा सोबत टेहरे चौफुलीवर नाकाबंदी लावली.काही वेळातच संशयित वाहन मारुती सुझुकी – MH 01 AB 6594 या क्रमांकाची कार त्या ठिकाणी आली.
नाकाबंदी थांबवली आणि भंडाफोड झाला…

वाहन थांबवून पोलिसांनी आत असलेल्या व्यक्तींना विचारपूस केली असता,त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.मात्र पोलिसांनी खाकी दाखवताच आरोपी पोपटासारखे बोलू लागले आणि संपूर्ण तस्करीची कबुली दिली.कारमधून तब्बल ४० किलो गांजा सापडला असून अटक करण्यात आलेले आरोपी :
1. सारीका देवानंद नायडू – गोरेगाव पश्चिम, मुंबई
2. समशेर उर्फ समीर अतिक अहमद – गोरेगाव पश्चिम, मुंबई
3. संतोष वडीवले – गोरेगाव पश्चिम, मुंबई

या प्रकरणी एन.डी.पी.एस कायदा कलम 8(क), 20(ब)(II)(C) अंतर्गत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यांची गांजा तस्करी मागील पार्श्वभूमी आणि नेटवर्क उघड करण्यासाठी तपास सुरु आहे…ही कारवाई समोर येताच मालेगाव, शिरपूर व मुंबईतील गांजा तस्करांच्या टोळक्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस आता यामधील आणखी सहकारी आणि साखळी तस्करी उघड करण्याच्या तयारीत आहेत.
ही कारवाई अमली पदार्थ विरोधातील मोहिमेतील एक मोठं पाऊल आहे. शहरात कोणत्याही प्रकारची तस्करी सहन केली जाणार नाही. तपास पुढे सुरु असून इतर आरोपींचा लवकरच छडा लावण्यात येईल.

ही कारवाई म्हणजे छावणी पोलिसांचा गुन्हेगारी विरोधात निडर आणि कठोर पवित्रा दर्शवते. गांजा, ड्रग्स, तस्करी यांना आळा घालण्यासाठी अशीच कठोर कारवाई होत राहिली पाहिजे, अशी जनतेकडून जोरदार मागणी होत आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.