महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील चिंबावे. आरोग्य केंद्र विभागातील शेजारच्या गावांना जवळ असल्याने रुग्ण या आरोग्य केंद्रात रोज आरोग्य सेवा घेत असतात या आरोग्य केंद्रात चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा दिली जाते आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देत असतात परंतु गेल्या एक जानेवारीपासून आरोग्य अधिकारी नसल्याने चिंबावे. आरोग्य केंद्रात पंचक्रोशीतील रुग्णांची व विभागातील जनतेची गैरसोय होत असल्याचे दिसते पूर्वी आरोग्य केंद्रामध्ये दोन आरोग्य अधिकारी होते परंतु नंतर काही कालांतराने एक आरोग्य अधिकारी दोन अधिकाऱ्यांची कामे करत होता गेली पाच वर्षे सेवा करणारे आरोग्य अधिकारी यांना अजून कोणत्याही प्रकारचे ऑर्डर पत्र दिले जात नसल्याने चिंबावे. आरोग्य केंद्रात उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच खाडीपट्ट्यातील जनतेला आरोग्य सेवा द्यावी लागते मग आरोग्य केंद्र बंद अवस्थेत राहणार की काय अशी अवस्था झाली आहे या आरोग्य केंद्रामध्ये तात्कालीन आरोग्य अधिकारी यांचे नियुक्ती करावी व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यावरून पडणारा भार हा कमी करण्यात यावा चिंबावे आरोग्य केंद्रामध्ये अधिकारी नसल्याने आरोग्य केंद्र बंद पडते की का असे प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाले आहेत आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य अधिकारी नेमण्याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते काडीपट्ट्यातील आरोग्य केंद्र हे पंचक्रोशीतील वीस गावांना मिळून एकच आरोग्य केंद्र असल्याने या आरोग्य केंद्रात गैरसोय होत असेल तर रुग्णांना 22 किलोमीटर महाडसारख्या खाजगी रुग्णालयात आरोग्य सेवेसाठी जावे लागते तरी चिंभावे आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी जनतेमध्ये होत आहे

