महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाड तालुक्यातील खाडीपट्टा मधील वलंग शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल वलंगचे विद्यमान मुख्याध्यापक मा.राजन महादेव कुर्डूनकर यांच्या येत्या २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्ती निमित्त सायंकाळी ४ वाजता शाळेचे आवारात एका विशेष निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मंत्री मा.भरतशेठ गोगावले व नवनिर्वाचित रा.जि.प.सदस्य मा.विकासशेठ गोगावले उपस्थित राहणार असून वलंग शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री.दिलीप म.साळवी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
या विद्यालयाचे मुख्यध्यापक म्हणून सेवानिवृत्त होणाऱ्या राजन कुर्डूनकर यांच्या ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांनी शिक्षकापासून या शाळेत सुरुवात केली होती. त्यांच्या या प्रदीर्घ सेवाकाळात शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्यांच्याकडून विद्यादानाचा लाभ घेतला. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त होणाऱ्या या विशेष निरोप समारंभाच्या कार्यक्रमास माजी विद्यार्थ्यांसह शिक्षण प्रेमी नागरिक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वलंग शिक्षण प्रसारक मंडळातर्फे माजी कार्यवाह प्रभाकर सागवेकर,खजिनदार रामदास धाडवे, सर्व पदाधिकारी,ज्येष्ठ शिक्षक गंगाधर साळवी यांनी केले आहे.

