डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयास मुंबई विद्यापीठात सोशल ॲक्शन अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले…

0
3

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

           जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी गावांनी सहभाग घ्यावा यासाठी ब्रिटिश कौन्सिल आणि मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला असून यासाठी  महाविद्यालयात  ग्रीन क्लब  स्थापन करण्यात आले असून त्याच्या माध्यमातून गावचे जैव विविधता सर्वेक्षण, जल व्यवस्थापन आणि एनर्जी ऑडिट हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबई विद्यापीठ अतंर्गत सलग्न असलेले 150 महाविद्यालयातील ग्रीन  क्लब  यांनी मागील वर्षभरात केलेले कामाचा  आढावा घेण्यासाठी दिनांक16 फेब्रुवारी रोजी मुंबई विद्यापीठात कार्यशाळा  आयोजित  करण्यात आली होती.

            श्री राजेंद्र सामाजिक विकास संस्था नाते यांचे सहयोगाने डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या ग्रीन क्लब ने प्राचार्य डॉ योगेश बोराळे आणि समन्वयक डॉ पंचकुला निंगदाळे यांचे मार्गदर्शना खाली  महाड तालुक्यातील तळोशी ग्राम पंचायत सरपंच सौ साक्षी सचिन पार्टे आणि ग्राम पंचायत अधिकारी संदीप बागडे यांचे सहकार्याने तळोशी गावचे जैव विविधता सर्वेक्षण, जल व्यवस्थापन ऑडिट आणि एनर्जी ऑडिट सुरू केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज कॅम्पसचे जैविक विविधता सर्वेक्षण पूर्ण केले असून,  रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा करंजखोल येथे वन औषधी  गार्डन आणि पंचवटी बाग तयार करण्यात मोलाची भूमिका घेतली आहे.

          या कामाचा अहवाल महाड ग्रीन क्लब ने मुंबई विद्यापीठात सादर केला. या सादरीकरणास मुंबई विद्यापीठाकडून सर्वोत्कृष्ट सोशल ॲक्शन अवॉर्ड व ऐंशी हजार रुपये रोख पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजेंद्र कुलकर्णी आणि  क्लायमेट स्किल उपक्रम समन्वयक डॉ अपर्णा फडके आदी मान्यवरांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ.पंचफुला माधवराव निंगदाळे आणि क्लब चे स्वयंसेवक शुभम पानपाटील, सौभाग्यलक्ष्मी, पराडा, अफिया साखरकर पुजा मोहंता, सृष्टी महाडिक, राज बाटे, लाखो मेस्त्री, आणि अक्षय महाडिक यांची हा पुरस्कार स्विकारला.