संतापजनक…उरण पाठोपाठ सीवूडसमध्ये प्रेयसीची हत्या… २० वर्षांच्या प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या…

0
124

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-  

उरणमधील 20 वर्षीय यशश्री शिंदेच्या हत्येची घटना ताजी असतानाच बुधवार दि.७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सीवूडसमध्ये आणखी एका 19 वर्षीय तरुणीची डीपीएस लगतच्या तलावात हत्या करून टाकून देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे… भाविका मोरे वय वर्ष 20 असे या तरुणीचे नाव असून तिचे पनवेल येथील स्वस्तिक पाटील वय वर्ष 22  या तरुणासोबत प्रेम संबंध असल्याचे व त्यानेच भविकाचा गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः देखील तेथील तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे… त्यानुसार पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे… बुधवारी सायंकाळी सिवूड्स येथील डीपीएस लगतच्या तलावात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना भाविका मोरे हिचा मृतदेह निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भविकाचा मृतदेह ताब्यात घेतला. प्रथमदर्शनी भविका हिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे आढळून आले आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी  सांगितले.पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता भावीका आणि तिचा प्रियकर स्वस्तिक पाटील हे दोघेही दुपारी चारच्या सुमारास दुचाकीवरून सिवूड्स येथील डीपीएस लगतच्या तलावाच्या दिशेने जाताना निदर्शनास आले. परंतु स्वस्तिक पाटील परत येताना निदर्शनास आला नाही. त्यामुळे त्याने भाविकाची हत्या केल्यानंतर त्याने येथील तलावात उडी मारल्याचा संशय आहे. सदर तलाव खाडीला लागून असल्यामुळे त्याचा मृतदेह खाडीत वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बेपत्ता स्वस्तिक पाटील याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले… भाविका मोरे हिचा स्वस्तिक पाटील याच्यासोबत प्रेमसंबंध होते. हे दोघेही बुधवारी सायंकाळी सीवूडस येथील डी पी एस तलावालगत आल्यानंतर त्या दोघांमध्ये भांडण झाले असावे, असा पोलिसांना संशय आहे.मात्र आता दोघेही नसल्याने त्यांच्यात नेमके कोणत्या कारणावरून भांडण झाले, हे सांगणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले. एन आर आय पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, या घटनेतील मृत भाविका मोरे ही नेरुळमध्ये राहण्यास होती, तसेच सध्या ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. भाविकाच्या वडिलांचे निधन झाल्याने सध्या ती आई व बहिणीसह राहत होती. तर स्वस्तिक पाटील हा पनवेलमध्ये राहण्यास होता, तो एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता…