माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके ):-
ताम्हणी घाटमार्गे रायगडमधून पुण्याला जोडणाऱ्या माणगाव-पुणे रस्त्याची विळे भागाड MIDC मध्ये पार दुरावस्था झाली आहे…या ठिकाणी एका बाजुला रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण चालू आहे… तर दुसर बाजुच्या रस्त्यावरुन वाहतुक सुरु आहे…प्रत्यक्षात पाहिले तर या ठिकाणी रस्त्याचे अस्तित्व नसून खड्डयांतुन मार्ग काढत प्रवास करण्याची वेळ वाहन चालकांवर येत आहे…या ठिकाणी छोट्या वाहनांसोबत अवजड वाहनांची संख्या अधिक आहे…खड्डे मोठे आणि खोल असल्याने वाहनांचे नुकसान होते आहे..त्याच बरोबर प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागत आहे… रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी प्रवाशी आणि वाहन चालकांकडून होत आहे… माणगाव पुणे रस्ता हा 2 आगस्ट ते 5 आगस्ट या काळात मार्गावरुन वाहतुकीसाठी बंद होता…मात्र सध्या काम करत असलेल्या ठेकेदारानी वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याचे खड्डेही भरले नाही…या खड्ड्यांमुळे जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण ?ठेकेदार की प्रशासन ?असा सवाल नागरिक विचारत आहेत…