उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
चिरनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.बाजीराव परदेशी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी अंकुश परदेशी मित्र मंडळ चिरनेर आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी चष्मे वाटप शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून 165 रुग्णांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले. तर मोतीबिंदू असणाऱ्या 12 रुग्णाची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
उरण परिसरात सर्वच क्षेत्रात अजात शत्रू म्हणून ओळखले जाणारे स्व. बाजीराव परदेशी यांचा मागील वर्षी 24 ऑगस्ट ला अल्पशा आजाराने मृत्यू झाला.आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमाखातर सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी हजेरी लावली होती.
त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून स्व.बाजीराव परदेशी यांचे छोटे बंधू सामाजिक कार्यकर्ते हेमंत परदेशी यांनी आकादेवी येथील आदिवासी शाळेतील गरज लक्षात घेऊन मोडकळीस आलेला दरवाजा बदलून नवीन दरवाजा दिला…तसेच त्याच आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना आणि चिरनेर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच खाऊचे वाटप हे करण्यात आले.
यावेळी चिरनेर सरपंच भास्कर मोकल,उपसरपंच सचिन घबाडी, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्या शुभांगी पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार परदेशी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष घनशाम पाटील,तालुका शेकाप उप चिटणीस सुरेश पाटील भाजपा उरण तालुका सहखजिनदार सुशांत पाटील, काँग्रेस युवा राजेंद्र भगत,हेमंत परदेशी, अमर परदेशी,बाजीराव परदेशी यांचे पुत्र शिक्षक वर्ग विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.तसेच नेत्र तपासणी शिबिरासाठी लक्ष्मी चारिटेबल ट्रस्ट तर्फे विनोद पांचगरे, मोहद खान, पायल पाटील, महिमा गावित, अनुष्का मालवणकर, त्रिशा जानकेती, दीप्ती जुरजुसे, अश्विनी चंदुरकर, प्रतिभा खेडकर, कुलदीप उन्हाळेकर, जयप्रकाश यादव तसेच मोठया संख्येने रुग्ण उपस्थित होते.या प्रसंगी अंकुश परदेशी मित्र मंडळातर्फे अधिक मेहनत घेण्यात आली.