Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रराजकीय नेत्यांची काही लोक सदा आवडती... नराधमांना पाठीशी घालणारे याचिकाकर्ते विकृत...

राजकीय नेत्यांची काही लोक सदा आवडती… नराधमांना पाठीशी घालणारे याचिकाकर्ते विकृत…

मुंबई  शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे ) :-

बदलापूरात शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्ह महाविकास आघाडीतर्फे ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. परंतु उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केल्यानंतर ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेण्यात आला. मात्र, राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी घेतला. त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाकडून दादरमधील शिवसेना भवनजवळ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली…नेते आणि कार्यकर्ते धो – धो पावसात भिजत घोषणाबाजी करत होते… यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नराधमांना पाठीशी घालणाऱ्या याचिकाकर्त्यांचा उल्लेख विकृत असा केला… तसेच राजकीय नेत्यांची काही लोक सदा आवडती झाली असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला…डोक्याला काळ्या फिती बांधून आणि हाती काळे झेंडे घेऊन धो –धो पावसात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, शिवसेनेचे माजी महापौर, आमदार, खासदार, नेते व कार्यकर्ते हे आंदोलनात सहभागी झाले होते. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याची पर्वा न करता कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनचा परिसर दणाणून सोडला.चिमुरडीला न्याय द्या; नाहीतर खुर्च्या खाली करा, नराधमांना फाशी झालीच पाहिजे, मिंधे सरकार हाय हाय, या सरकारचे करायचे काय; खाली डोके वर पाय अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments