पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दहीहंडीचा उत्साह ओसंडून वाहत होता… शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांच्या नेतृत्वाखाली कामोठे येथे प्रथमच भावी आमदार दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते…शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने दहीहंडीला १ लाख ११ हजार १११ रुपये पारितोषिक लावण्यात आले होते…या दहीहंडीला सकाळपासून आसपासच्या गोविंदा पथकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून सलामी दिली…व रात्री उशिरा शिरीषदादांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडण्यात आली… यावेळी विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, शहर प्रमुख रामदास गोवारी यांच्यासह कामोठे येथील शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…दरम्यान शिवसेनेच्या भावी आमदार दहीहंडी स्पर्धेची पनवेल विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा होती… दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांनी जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांना भावी आमदार म्हणून सलामी दिली…