मालवण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
सिंधुदुर्गातील राजकोट येथे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटांचा ब्राँझ पुतळा सोमवारी कोसळून पडला आणि… राज्यासह देश-जगभरातील शिवप्रेमी दुखावले… पुतळा कोसळल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली… या दुर्घटनेसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना लोकांनी जबाबदार धरले आहे… कारण हे काम म्हणजे… ए है मोदी की गॅरंटी… असे संतापाने बोलले जात आहे… पोलिसांनी हा पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्टचर इंजिनिअर चेतन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी भ्रष्टाचार करणारे बडे मासे मोकळे आहेत… पुतळ्याच्या कामात 100 टक्के भ्रष्टाचार झालाय… कारण वरवर पुतळा जरी पितळेचा असल्याचे सांगण्यात येत असले तरी तो फायबरचा आहे… त्यामुळेच पुतळा कोसळला…पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालेला शिवछत्रपतींचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांत कोसळला…
याप्रकरणाबाबत शिवसत्ता टाइम्सने सत्यशोधन केले असता धक्कादायक माहिती पुढे आली… शिवरायांचा पुतळा बसवण्याबाबत नौदलाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती… आज देशभरात भाजपचा हस्तक्षेप पाहता नौदलाच्या या कारभारात भाजपने १०० टक्के ढवळाढवळ केली आहे… या कामाचा ठेका कल्याणमधील आर्टीस्टी कंपनीला मिळाला… ही कंपनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खा.श्रीकांत शिंदे यांच्या अत्यंत जवळ आहे… काम करणाऱ्या शिल्पकाराचे जयदीप आपटे असे नाव असून तो अवघ्या २४ वर्षाचा आहे… मोठे पुतळे उभारण्याचा त्याला शून्य अनुभव आहे…आयुष्यात पहिल्यांदाच तो एव्हढा मोठा पुतळा उभारत होता… एका दैनिकात त्याची याबाबत मुलाखतही प्रसिद्ध झाली होती…या मुलाखतीत तो म्हणतो पितळेचा पुतळा उभारण्यास तीन वर्ष लागणार होते… मात्र आम्ही सहा महिन्यात काम पूर्ण केले… जून महिन्यात काम सुरु केले ते डिसेंबरला पूर्ण झाले… वाऱ्याचा वेग ताशी ४५ किमी असल्याने पुतळा बनवताना अनेक अडचणी आल्या… या पुतळ्यासाठी ३ डी पेंटींगचा उपयोग करण्यात आला… एका रात्रीत १८ प्रिंटिंग मशीनद्वारे हे काम पूर्ण करण्यात आले… दरम्यान पुतळा कोसळल्यानंतर तो पितळेचा दिसत नसून फायबरचा दिसत आहे… लोखंडी अँगलवर पुतळा उभारण्यात आला… त्यामुळे तो टिकला नाही… याकामी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे…