गोरेगाव शिवसत्ता टाइम्स (प्रसाद गोरेगावकर) :-
स्वदेश फाउंडेशनतर्फे जिल्ह्याभरात अनेक गाव वस्तीत गाव समितीची स्थापना करुन गावांमध्ये सुधारणा करण्यात येते व त्या त्या गांवाना स्वप्नातील आदर्श गांव म्हणून घोषित करुन गौरव करण्यात येते असाच स्वप्नातील गांव म्हणून माणगांव तालुक्यातील चापडी या गांवात आमचे गांव, स्वप्नातील गांव या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
माणगांव तालुक्यातील चापडी हे गांव कमी वस्तीचे असून तेथील ग्रामस्थांनी स्वदेस फाउंडेशनच्या मदतीने त्यांच्या स्वप्नातील गावाची स्वप्नपुर्ती करण्यात आली. काल दि. ३० ऑगस्ट रोजी मा. ना.अदितीताई तटकरे (मंत्री महिला व बाल कल्याण तथा पालक मंत्री रायगड जिल्हा) यांच्या प्रमुख उपस्थित चापडी गावातील युवक यांचे पथका सोबत जल्लोष करत व वाजत गाजत ढ़ोल ताशाच्या गजरात मिरवणुक काढत आदर्श गांव चापडी स्वप्नातील आदर्श गांव म्हणून घोषीत करत स्वदेश फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस रा. जि.प.शाळा शिक्षक मुकेश भोस्तेकर व विद्यार्थी टिम यानी स्वागत गीत सादर करत चापडी ग्रामस्थांच्या वतीने मा.अदितीताई यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले तसेच इतर सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत रामचंद्र शिंदे यानी केले. यावेळी गांव विकास समिती अध्यक्ष एडव्होकेट प्रदीप शिंदे यानी प्रास्ताविक करत चापडी गावाचा प्रवास स्वछते पासून सुरु केलेले आमचे छोटेस गांव आज आदर्श गांव झाले आहे. आमच्या गावाचा इतका मोठा गौरव होत आहे याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. या आदर्श गावाच्या प्रवासात आमचे चापडीतील सर्व समिती सदस्य, गावकी सदस्य, महिला मंडळ, गावातील व मुंबईकर युवक मंडळ यानी खुप मेहनत घेतली त्यांचे सर्वाचे योगदानामुळे हा सर्व आदर्श गांव प्रवास घडला. आता आम्ही थांबणार नसून आमचे चापडी गावाचा नाव लौकिक जगभर कसा होईल या साठी नेहमी आम्ही प्रयत्न शिल राहु असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर मा. ना. अदितीताई तटकरे यांचे हस्ते विभागात कार्यरत व ज्यानी सर्व ग्रामस्थांना एकत्रीत करुन चापडी गांवाचा आदर्श प्रवास घडवला असे स्वदेश फाउंडेशनच्या विभागाचे वरिष्ठ समन्वयक श्री.राजेन्द्र बेंद्रे यांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रंसगी बोलताना मा.ना.आदितीताई तटकरे यांनी स्वदेश फाउंडेशन चे प्रमुख रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांचा नाम उल्लेख करत स्वदेश फाउंडेशनचे मार्गदर्शन व सहभाग यातील आदर्श गांव संकल्पना व ग्रामीण सक्षमीकरण स्वदेश फाउंडेशनची टिम खुप उल्लेखनीय काम करत असून मी मंत्री या नात्याने सदैव स्वदेश फाउंडेशन करत असलेल्या गांव विकास प्रस्ताव कामे यांना नेहमी प्राधान्य देऊन मंजुरी देत असते या पुढेही देत राहीन अशी ग्वाही दिली तसेच शासन म्हणून नेहमी मी असेल मा. खासदार साहेब सुनीलजी तटकरे असतील, आमदार अनिकेत तटकरे असतील आम्ही सर्व स्वदेश फाउंडेशनने गांव विकासाचे वेगवेगळे प्रस्तावाना नेहमीच प्राधान्य देत मंजूरी देत असतो त्यामुळे या पुढे देखील रायगड मधील जास्तीत जास्त गावे आदर्श करावीत. आम्ही सदैव स्वदेश फाउंडेशन सोबत आहोत असे मत व्यक्त केले. तसेच स्वदेश फाउंडेशन चे संचालक मा. प्रदीप साठे यानी ग्रामीण सक्षमीकरण, महिला बचत गट व लाडकी बहीण योजनेचे कौतुक करत या अंतर्गत महिलाना रोजगार व बचत याचे स्वदेशच्या मार्फत देखील प्रशिक्षण देवून अधिक अधिक आपल्या बहिणी लखपती कशा होतील या साठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच शेतकरी गट व कंपनी, युवक रोजगार असे अनेक विषयावर भाष्य करत चापड़ी ग्रामस्थांना पुढील आदर्श गांव चे उद्दीष्ट सांगत शुभेच्छा दिल्या.
या वेळी मा. प्रदीप साठे संचालक स्वदेश फाउंडेशन, उपविभागीय अधिकारी मा. संदीपान सानप, माणगांव तहसिलदार मा. दशरथ काळे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मा. सुभाष केकाणे, राकेश शिंदे साहेब, गट विकास अधिकारी मा. संदीप जठार, गोरेगाव पोलीस निरीक्षक विजय सुर्वे, शादाबभाई गैबी, सरपंच मा. शुभांगी शिर्के, स्वदेश वरीष्ठ व्यवस्थापक मेघना फडके, मा.नझीर शिकलगार, मा.राजेंद्र शिर्के, मा.बळीराम खाडे सरपंच होडगाव, मा.सिद्धेश पालकर सरपंच लोणशी, उणेगाव उपसरपंच अरुण शिंदे, ग्रामसेवक तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी, पोलिस पाटील आणि गावातील सर्व पदाधिकारी, महिला मंडळ, मुंबईकर, नागरीक उपस्थित होते…