माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
माणगाव शहरातील वॉर्ड क्र.१६ खांदाड येथील तलावात व काठावर मगर दिसून आल्याने लोकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे…वर्दळीच्या रस्त्यावर देखील मगरी मुक्तपणे वावर करत असल्याची जोरदार चर्चा सध्या माणगावमध्ये सुरु आहे…सकाळी आणि सायंकाळी ठराविक वेळेला तलावाच्या काठावर लोकांना मगरीचे दर्शन झाल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी लोकांना मगरीचे पिल्लू दिसले होते… मुलांनी त्याचे व्हिडिओ चित्रीकरणही केले होते… मात्र गावातील युवकांना तलावात मोठ्या मगरी दिसून आल्या… ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मगरी पहाण्यासाठी लोक तलावाकडे येऊ लागले…मगरींचा वावर वाढल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे…मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून तलाव परिसराची पाहणी करण्यात आली…वनरक्षक वैशाली मॅडम व कार्यलयीन कर्मचाऱ्यांकडून तलावाची पाहणी केली…वर्दळीचा भाग लक्षात घेता तलावाच्या काठावर जाळीचे कापड,सूचना फलक लावण्यात आले…वनविभागाने वेळीच योग्य ती खबरदारी घेतल्याने सर्व स्तरातून वनविभागाचे कौतुक होत आहे…
यावेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माणगाव वनक्षेत्रपाल (संरक्षण) अनिरुद्ध ढगे,वनरक्षक वैशाली भोर, पवन चौधरी, अनिल मोरे सह ईतर वन मजुर तसेच काही स्थानिक नागरीक बाळा पोवार (डीजे), शुभम शिंदे, निरने गुरुजी, कैलास पोवार सह आधी उपस्थित होते.