उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा उरणमध्ये भीषण अपघात झाला आहे…उरण करंजा रस्त्यावर नंगेशहा दर्ग्याच्या पुढे आगरी कट्ट्याजवळ ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास डंपर व दुचाकीचा अपघात झाला…करंजा येथील १८ वर्षीय तरुणी दगडाने भरलेल्या डंपरच्या टायरखाली आल्याने तिची जागीच प्राणज्योत मालवली…अपघातात मृत झालेली तरुणी ही कोंढरीपाडा करंजा येथील असून तिचे नाव रितू संजय कोळी असे आहे… ही घटना समजताच उरण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. मिसाळ यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली…
गेल्या कित्येक दिवसांपासून उरणमध्ये अपघाताचे सत्र सुरुच असून कोणाच्या तरी दबावाखाली येऊन उरण पोलिस गुन्हे दाखल करीत नसल्याची चर्चा सध्या उरणचे नागरिक करीत आहेत…उरणमधील सामाजिक संघटना अपघाताचे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत…या घटनेचा अधिक तपास उरण पोलीस करीत आहेत…