Saturday, November 23, 2024
Homeअपघातसाधना नायट्रो केमिकल कंपनीला भीषण आग... चार कामगार जखमी व दोघांचा जागीच मृत्यू...

साधना नायट्रो केमिकल कंपनीला भीषण आग… चार कामगार जखमी व दोघांचा जागीच मृत्यू…

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

ऐन गणेशोत्वाच्या काळात धटाव एमआयडीसी हद्दितील साधना नायट्रो केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला…या स्फोटामध्ये चार कामगार जखमी तर दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे…धाटाव MIDC,प्लॉट नंबर-47 येथील साधना नायट्रो केमिकल लिमिटेड कंपनीत 11:15 च्या सुमारास ODB2 केमिकल प्लांट मध्ये ODB2 प्रॉडक्ट वॉशिंग करण्यासाठी असलेल्या मेथानोल केमिकलच्या स्टोरेज टॅंकवर M.K.फॅब्रिकेटर्सचे ६ कामगार वेल्डिंग काम करीत असताना मेथानोल केमिकल टॅंकचा ब्लास्ट होऊन त्यात ६ कामगार जखमी झाले आहेत… त्यापैकी 2 कामगारांचा मृत्यू  झाला असून ते परप्रांतीय असल्याचे समजते…  तर 4 कामगार जखमी झाले आहेत… जखमींना उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल, रोहा येथे तात्काळ दाखल करण्यात आले आहे…अपघातात दिनेश कुमार खरभन वय 60 रा बाभनौली अदाई जि.अजमगड उत्तर प्रदेश, व संजीव कुमार वय 20 रा. इलाहबाद प्रयागराज असे आहेत… सदर घटनेची माहिती मिळताच SDPO, रोहा व स्टाफ असे फायर ब्रिगेडसह हजर झाले आहेत… घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments