पेण तालुक्यातील भाल गावातील यशंवत म्हात्रे (बाबुशेठ) यांच्या घरी गौराईचे आगमन…

0
89

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

                 पेण तालुक्यातील भाल गावात यंशवत म्हात्रे यांच्या घरी गौराईचे दर्शन घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली… सर्वत्र गणेशोत्सवाची धूम तसेच गौरी पूजनच्या निमित्ताने सर्वत्र महिलांच्या नृत्याचे सूर घुमु लागलेत…  महिलांच्या माध्यमातून अनेक गावात जोपासली जाणारी जाते नृत्याची परंपरा आपल्या आनंदाचा पारावर गगनात मावत नसताना महिला वर्ग मोठ्या हौसेने पारंपरिक गीते गात आपल्या घरी गौराईंना वाजत गाजत आणताना पाहायला मिळाल्या… गौराईचे गावो-गावी दारोदारी उत्साही वातावरणात स्वागत केले…              

       पेण तालुक्यात देखील गौराईचे काल जल्लोषात आगमन झाल्यानंतर  पारंपरिक पद्धतीने मनोभावे पूजन करण्यासाठी महिलावर्गाची चांगलीच लगबग पहावयास मिळाली…. नवनवीन विविध रंगाच्या साड्या परिधान करून आज गौराईचे पूजन करताना सुहासिनिची दर्शनसाठी मोठी गर्दी पहावयास मिळत होती… यावेळी यशंवत (बाबुशेठ) म्हात्रे निर्मळा म्हात्रे रोहन म्हात्रे राहुल  म्हात्रे  रोशनी  म्हात्रे  रिध्दी  म्हात्रे  भाल गावातील ग्रामस्थ महीलावर्ग व म्हात्रे  पाटील परिवार उपस्थित होते…