खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे ):-
कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघांचे आमदार महेंद्र थोरवे यांची सोशल मिडीयावर अथवा विविध प्रसार माध्यमांवर नाहक बदनामी केल्याबाबत कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वतीने आज दि.१३ सप्टेंबर रोजी मतदार संघातील कर्जत, खालापूर, खोपोली पोलिस ठाण्यात शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार महेंद्र थोरवे यांची सोशल मिडीया व प्रसामाध्यमांद्वारे नाहक बदनामी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे…
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दोन दिवसांपूर्वी नेरळ शहरात एक घटना घडली होती… यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करत असताना दिसत आहे… ही मारहाण त्यांच्या वैयक्तिक वादातून झाल्याचे समजते… या झालेल्या वादाचा आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी कोणताही संबंध नसताना नाहक विरोधकांच्या वतीने आमदार महेंद्र थोरवे यांची बदनामी केली जात आहे… तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना खालापूर तालुक्यात घडली होती, त्या वेळेसही पोलिस स्टेशनमध्ये आरोपींवर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता… विरोधकांच्या वतीने त्या गुन्ह्याशी कोणताही संबंध नसताना त्याही वेळेस आमदार महेंद्र थोरवे यांच्या बाबतीत घाणेरडा अपप्रचार केला असल्याचे देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे… येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन विरोधक हे सर्व राजकारण करताना दिसत आहे… त्यामुळे सद्यस्थितीत आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर केलेले आरोप विरोधक जाणीवपूर्वक करत असून याचा तीव्र निषेध कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे… कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघांचे आमदार महेंद्र थोरवे यांची सोशल मिडीयावर अथवा विविध प्रसार माध्यमांवर नाहक बदनामी केल्याबाबत निषेध व्यक्त करीत संबंधित व्यक्तींवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र कर्जत, खालापूर, खोपोली पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे… यावेळी कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…