खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षा रक्षाकाकडून एका वाहन चालकाला भर रस्त्यात लोखंडी रॉडने मारहाण केली जात असल्याची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने ही चित्रफीत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. शिंदे राजवट फक्त गुंडासाठीच आहे”, असे म्हणत ठाकरे गटाने शिवेसनेच्या शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे… दुसऱ्या बाजूला नेरळ येथील घटनेप्रकरणी ठाकरे गटाचे आरोप आमदार थोरवे यांनी फेटाळले आहेत….ठाकरे गट माझी बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे…यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड उपजिल्हाप्रमुख यांनी शिवसत्ता टाइम्सशी बोलताना सांगितले की …मतदार संघातील जनता सर्वज्ञात आहे… मारहाण प्रकरणातील आरोपी हा आमदार थोरवे यांचा पगारी कार्यकर्ता असून त्याच्यावर नेरळ ,कर्जत ,खालापूर,खोपोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे… याप्रकरणी ठाकरे गटाकडून रायगड पोलिस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे… आगामी निवडणुका या दोन महिन्यात होणार असून विधानसभा मतदार संघातील जनता मतपेटीतून गुंडशाही मोडून काढेल… त्यामुळे ठाकरे गटावर आरोप करण्याची गरज नाही… असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनी दिला आहे…राज्यभरात गुंडगिरी वाढली असून कायदा व सुव्यवस्थेची वाट लागली असल्याची चर्चा संपूर्ण कर्जतमध्ये आहे…