पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आरक्षणाबाबत देशात एक आणि देशाबाहेर एक अशी दुटप्पी भूमिकेचा भारतीय जनता पार्टी पेण तर्फे आज शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता भाजपा कार्यालयासमोर भाजपचे राज्यसभेतील खासदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण तालुका भाजपाच्या तर्फे जाहीर निषेध करुन आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाच. अरे कोण म्हणतं मिळणार नाय घेतल्या शिवाय राहणार नाय राहुल गांधी हाय हाय अशा प्रकारे राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध व्यक्त करीता भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांनी बोलताना सांगितले की, भाजपची भूमिका आरक्षणाच्या बाजूने असून आरक्षणाचे रक्षण करण्याची ग्वाही ही आमची भूमिका आहे. गेले चार दिवसांपूर्वी राहुल गांधी यांचा झालेला अमेरिका दौऱ्याप्रसंगी आरक्षणाबाबत त्यांनी जी भूमिका मांडली विधान केले त्याचा भाजप पक्षाचे वतीने मी जाहीर निषेध करतो. राहूल गांधी यांचा खरा चेहरा आरक्षणाच्या या विधानाने जनतेसमोर आणणे ही या आंदोलनातील भाजपची भूमिका आहे. वास्तविक घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी वंचीत समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची संकल्पना मांडली यापूर्वी राजर्षी शाहू महाराज व त्यांच्या अगोदर अन्य थोर विभूती नीही समाजाच्या उन्नतीसाठी याबाबत पुढाकार घेतला होता. जेणेकरून या समाज घटकातील सर्वाना या स्पर्धेच्या युगात आपली गुणवत्ता आणि आरक्षणामुळे समतोल असा एकसंघ समाजाची निर्मिती होईल आणि या अनुषंगाने समाज आणि राष्ट्राचा विकास होईल असे मला वाटते. पण राहुल गांधी यांचे विधान दुप्पटी पणाचे असल्याने या त्यांच्या विधानाचा आम्ही रायगड जिल्हा भाजपच्या वतीने जाहीर निषेध करतो असे शेवटी त्यांनी स्पष्ट केले
या निषेध मोर्चा प्रसंगी भाजपा पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य डी.बी.पाटील, प्रभाकर म्हात्रे, पेण न.पा. माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रफुल्ल म्हात्रे, उपसभापती नितीन पाटील, यूवा मोर्चाचे पेण विधानसभा अध्यक्ष गणेश पाटील, विवेक जोशी व पेण तालुका पातळीवरचे विभागातील पदाधिकारी सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. एकुण छोटा पॅक बडा धमाका असे या मोर्चाचे स्वरुप होते.