Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडइर्शाळवाडी दरडग्रस्त्तांच्या घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात... इर्शाळवासिकर दसरा दिवाळीत जाणार हक्काच्या नवीन...

इर्शाळवाडी दरडग्रस्त्तांच्या घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात… इर्शाळवासिकर दसरा दिवाळीत जाणार हक्काच्या नवीन घरात

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):

इर्शाळवाडीचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आले असून शेवटचा हात फिरवण्याचे काम सूरु असल्याने यंदाचा गणपती नविन घरात नाही आला, पण दसरा दिवाळी नक्की साजरी होईल,असे पुनर्वसनचे काम बघताना दिसले…
१९ जुलै २०२३ च्या मध्यरात्री र इर्शाळवाडी होत्याची नव्हती झाली होती… हा-हा म्हणता सर्व संपून गेले… ८४ जणांनी मृत्यूला कवटाळले, तर ८३ जनावरे दगावली होती… ४९ घरे आणि ७ गोठे कायमचे जमीनदोस्त झाली… २२ मुले आपल्या आई-वडिलांना कायमची पारखी झाली. ही मन हेलावणारी घटना झाली… यानंतर ताबडतोब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री उदय सामंत,मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, मंत्री दादा भुसे स्थानिक आमदार महेश बालदि, महेन्द्र थोरवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीकांत शिंदे,सरपंच रितू ठोंबरे यांच्यासह विरोधी पक्षनेते यांनीही घटनास्थळी भेट घेतली होती…जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी अजित नैराळे,तहसीलदार आयुब तांबोळी यांनी वरिष्ठांच्या व स्वतः मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांचे तात्पुरते पुनर्वसन चौक येथे बंद असलेल्या पेट्रोल पंप येथील कंटेनर हाऊसमध्ये स्थलांतर करण्यात आले. गेल्या वर्षी गणपतीची आरती करण्याचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवास्थान वर्षा येथे इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त यांना दिला. चौक मानिवली येथील स. नं.२७/१/ब येथे इर्शाळवाडीचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात असून येत्या दसऱ्याला आपल्या हक्काच्या घरात दसरा दिवाळी साजरी होईल,असे वाटते. शासकीय धोरणानुसार घरांच्या कामांचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न स्विकारता घराला घरपण असावे असा घरांचा आराखडा तयार करण्यास सांगून वास्तवातील घरे बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.एखादया श्रीमंत वसाहतीत गेल्याचा अनुभव होत आहे.४४ घरांचे बांधकाम पूर्णत्वास जात आहे.दरम्यानच्या काळात त्यांना हरवलेली कागदपत्रे,आधारकार्ड, बँक पासबुक, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. चोवीस तास पाणी पुरवठा, वैद्यकीय सुविधा, लाईट बरोबर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. एक निसर्ग रम्य ठिकाणी घरकुल योजना साकारत असताना, तिथे वास्तव्य केल्यावर देखील आपल्यांची आठवण कायमस्वरूपी राहीलच, पण राज्यातील इतर पुनर्वसनपेक्षा इर्शाळ वाडीचे पुनर्वसन स्थानिक पातळीवर असणाऱ्या अधिकारी,कर्मचारी यांच्या मूळे लवकर होत आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments