Friday, November 22, 2024
Homeअपघातकिल्ले रायगडजवळ घाटात गाडी ३० फूट दरीत...नवी मुंबईचे ४४ पर्यटक खाजगी गाडीत...

किल्ले रायगडजवळ घाटात गाडी ३० फूट दरीत…नवी मुंबईचे ४४ पर्यटक खाजगी गाडीत खच्चून भरलेले…

महाड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन,निलेश लोखंडे):-

नवी मुंबईच्या पर्यटकांना रायगड किल्ल्यावर घेऊन आलेली खाजगी आराम बस रायगड किल्ल्याजवळील कोझर घाटात शेवटच्या वळणावर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ३० फूट खोल दरीत कोसळली… नवी मुंबईचे ४४ पर्यटक खाजगी गाडीत खच्चून भरलेले होते… MH 0४ JK८३८२ ही खाजगी बस कोंझर घाटातील शेवटच्या वळणावर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले… सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही… काही मोजक्या प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्याचे सांगण्यात येत आहे… त्यानंतर या बसमधील प्रवाशांना पुन्हा ऐरोली नवी मुंबई येथे जाण्यासाठी महाड एसटी आगाराकडून बस व्यवस्था करण्यात आली होती… या अपघाताला राष्ट्रीय महामार्ग रायगड प्राधिकरण जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला… यापूर्वीही असेच अपघात झाले आहेत… मार्गावर अवघड वळणे, धोकादायक घाट असताना कोणत्याही ठिकाणी दिशादर्शक फलक अथवा रात्रीच्या वेळेस रेडियमच्या लाल रंगाच्या पट्ट्या व साईड पट्ट्या दिसण्यासाठी फ्लॅशर्स नाहीत… अपघाताची माहिती मिळताच महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे यांनी योग्य ती मदत पुरवण्याचे काम केले… तर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.सानप, महाड अग्निशामक दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments