सिडकोच्या अध्यक्षपदी आ.संजय शिरसाट… नवी मुंबई, रायगडचे कोणी मिळालेच नाहीत 

0
132

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील): 

महाराष्ट्र राज्यातील  विधानसभा निवडणुकांना अवघे दोन महिने शिल्लक असताना शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या महायुती सरकारने सिडकोचा अध्यक्ष सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी जाहीर केला… शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे… महायुती सरकारला सिडकोच्या अध्यक्षपदी बसवायला नवी मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई येथील कोणी आमदार मिळाला नाही… त्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांना सिडकोचे अध्यक्षपद दिले आहे… अशी टीका विरोधकांनी केलेय…