सांगली शिवसत्ता टाइम्स (वार्ताहार):-
भाजप आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अद्यापही सुरुच आहे. नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलय…पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देतो. त्यांनी त्यांची ताकद दाखवावी, आम्ही आमची ताकद दाखवतो…असे नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणे यांची सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चाची सभा पार पडली. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले…या लोकांना काय वाटते की, ह्यांच्या धमक्यांना भीक देणारे आम्ही लोक आहोत. आम्ही सांगतो, चला या पोलिसांना सांगतो की, एक दिवसाची सुट्टी देतो. तुम्ही तुमची ताकद दाखवा…हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानात उतरतो. आम्हालाही बघायचे आहे की, त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात की मुसलमान बघतात. तुम्हाला त्या जिहाद्यांना आवरायला जमत नसेल तर एक दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या. त्या लोकांना साफ करण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल…पुढच्यावेळी एकही लव्ह जिहादची केस तुमच्यासमोर आली तर आधी त्याला शोधा, त्याच्या तंगड्या तोडा. मला फोन करा. काहीही होणार नाही ही माझी जबाबदारी”, असे नितेश राणे म्हणाले.नितेश राणे यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माध्यमांना विचारले असता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले . “मी इथे आमदार किंवा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही तर हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे. मी माझ्या धर्माचे काम करतोय. आज आमच्या धर्माला आव्हान दिले जातेय…धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकीत विटंबना केली जात आहे… दगड मारली जात आहेत म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका मांडतोय आणि माझ्या धर्मासाठी लढतोय…अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली….
आमच्या देवावर बोलला तर आम्ही गप्प बसणार नाही…तुम्ही एका बापाचे आहात का? बाप विचारले तर एकमेकांकडे बघता. तुमचे आडनाव तरी एक आहे का? वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना थांबवले नाही तर आपले सण साजरे करू देणार नाहीत. मस्जिद असल्यावर पोलीस अधिकारी आम्हाला मार्ग बदलायला लावतात. मुस्लिम समाजला का रूट बदलायला लावत नाहीत? सावरकर म्हणतात, हिंदूंना हिंदूकडून भीती आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या नावाने ब्रिगेड खोलली, संभाजीराजे समजून घ्या. जाणते राजे गणपती दर्शनाला गेले, पण ज्ञानेश महारावला सांगितलं नाही असे बोलू नको. मुस्लिमबाबत महाराव बोलले असते तर आज अंत्ययात्रा निघाली असती. त्यांचा आपण फक्त निषेध यात्रा काढत आहोत. अपशब्द वापरणाऱ्यांना सोडत असाल तर तुमचा काय उपयोग?”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला.