उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरणमध्ये सध्या हम करे सो कायदा… हा प्रकार सुरु आहे… सरकार आणि प्रशासन यापैकी कोणाचा आधार उरणकरांना राहिलेला नाही…याला जबाबदार काही उरणकरही आहेत… ते निवडणुकीत पैसे घेऊन मतदान करतात… परिणामी उरणकरांच्या मूलभूत हक्कांवर जेव्हा गदा येते तेव्हा आमदार, खासदार ढुंकूनही पाहत नाहीत… आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने मग प्रशासन, शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा बेफाम होते… ते कोणाचे ऐकत नाहीत… जनतेवर अन्याय करतात… उरणमध्ये तहसील यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा अशीच बेफाम झाली आहे… तहसीलदारांकडे तक्रार करूनही ते अनधिकृत बांधकामावर कारवाई करत नाहीत… उदा. केगाव दांडा समुद्रकिनारी उभे राहत असलेले मोठे हॉटेल… सी. आर . झेड. कायद्याचे उल्लंघन होऊनही त्यावर कारवाई नाही… दुसरा प्रकार म्हणजे उरणची वाहतूक पोलीस यंत्रणा… उरण पोलीस वाहतूक शाखेने द्रोणागिरी रेल्वे स्टेशनजवळील रस्त्याच्या साईडला उभ्या असलेल्या मोटारसायकलवर कारवाईचा बडगा उगारला आहे… या दुचाकी बाहेर लावल्याने कुठेही वाहतूक कोंडी होत नाही… तरीही उरणचे वाहतूक पोलीस सक्रिय झाले आहेत… या पोलिसाना उरण शहरासह तालुक्यात जागोजागी असलेली ट्रेलरची अनधिकृत पार्किंग दिसत नाही… फक्त गरीब, मध्यमवर्गीयांच्या दुचाकी दिसतात… कामावर जाणाऱ्या, तुटपुंजी कमाई असलेल्या दुचाकीधारक जनतेला पोलीस असे छळत आहेत… हिट अँड रन प्रकरणी उरण पोलीस कारवाई करत नाहीत… फक्त गोरगरिबांना त्रास दिला जात आहे… वस्तूस्थिती अशी आहे की… उरणमध्ये उरणकरांची शेतीची जागा बळकावून येथे रेल्वे सुरु झाली… लोकांच्या सेवेसाठी ही रेल्वे सेवा आहे…. रेल्वेने उरणकरांची जागा घेऊन तेथे भलीमोठी स्टेशन्स उभारली आहेत… या स्टेशन्सच्या आवारात लोकांना मोफत दुचाकी पार्किंग देणे गरजेचे असताना ही पार्किंग खाजगी लोकांना चालवायला दिली आहेत… सरकारी मालमत्ता असलेल्या रेल्वेचा हा पैशांचा व्यवहार संतापजनक आहे… लोकांना मोफत पार्किंग देण्याऐवजी त्यांच्यावर भुर्दंड लादला जात आहे… उरणकरांचे हक्क आणि अधिकार रेल्वेने पायदळी तुडविले आहेत… लोकांना संविधानाने दिलेले आपले हक्क अधिकार माहित नाहीत… रेल्वेने प्रवाशांना मोफत पार्किंग न देणे हा कायदा कधी झाला? याचा जाब खासदारांना विचारला पाहिजे… पण उरणकर कोणत्या तोंडाने खासदारांना जाब विचारतील… कारण काही उरणकरांनी पैसे घेऊन मतदान केलेले आहे… त्याचे परिणाम आत्ता भोगावे लागत आहेत… उरण रेल्वेने स्टेशनमध्ये सध्या पार्किंग सुरु केल्याने उरणकर स्टेशनच्या बाहेर गाड्या लावत आहेत… या दुचाकी लावल्याने कोणतीही वाहतूककोंडी होत नाही… तरीही उरणचे वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत… तिकडे ट्रेलरच्या वाहतूककोंडी करणाऱ्या पार्किंगला अभय… तर इकडे वाहतुककोंडी न करणाऱ्या दुचाकींवर कारवाई… दोन्ही बाजूने मरण उरणकरांचे… वाहतूक पोलिसांना कारवाईचा अधिकार कोणी दिला ? हा सवाल जनतेचा आहे…