पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
ग्रामीण भागातील जनतेला दिलासादायक माहिती आहे… आता दाखल्यासाठी ग्रामपंचायतीत जाण्याची गरज नाही… लोकांना घरबसल्या दाखला मिळणार आहे… शासनाने ‘महा ई-ग्राम सिटीझन कनेक्ट ॲप विकसित केले आहे… पनवेल पंचायत समिती कार्यालयाकडून या ॲपबाबत जनतेला माहिती दिली जात नसल्याचा आरोप आहे… लोकांना घरबसल्या जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, दारिद्र्येषेखालील प्रमाणपत्र, पीएम विश्वकर्मा, ई-श्रमकार्ड, महात्मा फुले योजना, भारत ग्रामपंचायत स्तरावरून मिळणारे विविध दाखले मिळणार आहेत… ज्याठिकाणी हे ॲप कार्यरत आहे… तेथे असे दाखले मिळत आहेत… पनवेलमध्ये हे ॲप कार्यरत नसल्याची माहिती शिवकर गावचे माजी सरपंच अनिल ढवळे यांनी पत्रकारांना दिली… ग्रामस्थांना जास्तीत जास्त सुविधा घरबसल्या कशा देता येतील, याकडे शासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायतराज विभागामार्फत महा ई-ग्राम सिटीझन कनेक्ट नावाचे एक मोबाइल ॲप्लिकेशन ॲप कार्यान्वित केले आहे.
हे ॲप या पद्धतीने इन्स्टॉल करा… मोबाइलमधील प्ले स्टोअरमधून महा ई-ग्राम सिटीझन कनेक्ट हे ॲप इन्स्टॉल करा… ॲप ओपन करून रजिस्टर करा… यामध्ये आपले नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी ही सर्व माहिती जतन करा… त्यानंतर मिळालेल्या युजर पासवर्डद्वारे लॉगिन करा… ॲप इन्स्टॉल करण्यासाठी या लिंकचा वापर करता येईल…