श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (संदेश पेडणेकर):-
रायगड-श्रीवर्धन येथे संकष्टी चतुर्थी दिवशी साखरचौथ गणपती बाप्पा विराजमान झाला…रायगड श्रीवर्धन वेळासआगर येथे साखरचौथ गणपती बाप्पा साजरा केला जातो… हे दुसरे वर्षे आहे…वेळास गावातील सर्व महिला एकत्र येऊन 121 मोदक बनवतात… हा मोदकांचा नेवैद्य देवाला दाखवतात… भजन, नाच गाणी महिला आणि पुरुष मंडळी सादर करतात…
गणपती बाप्पाची आरती सकाळी-संध्याकाळी केली जाते… तसेच सगळ्यांना दुसऱ्या दिवशी महाप्रसाद दिला जातो… आजू बाजूच्या गावातील लोक खुप मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतात… बाप्पा विसर्जन खुप मोठ्या धूम धडाक्यात करतात… गावामध्ये शांतता नांदावी, सगळे सुखी आनंदी राहावे, गावावर कोणते संकट येऊ नये अशी प्रार्थना सगळे वेळासवासी गणपती चरणी करतात…