Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रलालबागच्या राजाचे उत्पन्न जाहीर...विक्रमी दान भटजी म्हणजेच पुजाऱ्यांना मिळालेले उत्पन्न किती?...

लालबागच्या राजाचे उत्पन्न जाहीर…विक्रमी दान भटजी म्हणजेच पुजाऱ्यांना मिळालेले उत्पन्न किती?…

शिवसत्ता टाइम्स प्रवीण कोळआपटे मुंबई

२०२४ मध्ये लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने आणि रोकड अर्पण केली… मंडळाच्या मतानुसार विक्रमी दान मिळाले… भाविकांनी दिलेल्या दानाचा शनिवारी लिलाव पार पडला… त्यातून मंडळाला करोडो रुपये मिळाले… शिरस्त्यानुसार लालबागच्या राजाचे उत्पन्न लोकांसमोर जाहीर झाले… लालबागच्या राजासारखेच मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल मनपा, उरणसह रायगडमध्ये सार्वजनिक गणपती आहेत… त्यांनाही करोडोत नसले तरी लाखोत आणि हजारोत दान मिळाले आहे… हे सर्व दान मंडळाच्या वतीने लोकांसमोर जाहीर करण्यात येते… करोडो रुपयांची उलाढाल गणपती उत्सवात होते… हे करोडो-अब्जो रुपये सर्वसामान्य शेतकरी, कामगार,व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, वाहनचालक, कष्टकरी जनतेचे असतात… हा १० ते १५ दिवसातील सर्व पैसा एखाद्या छोट्या राज्याच्या बजेट एवढाच किंवा त्याहूनही अधिक असतो… एवढा पैसा महाराष्ट्रातील कोकणसारख्या लहान विभागात आहे… असे असताना सरकार निधीची कमतरता, विकासकामांना निधी नाही… असे कोणत्या तोंडाने बोलते…? सरकारला हा पैसा दिसत नाही काय?… विकासकामांसाठी उद्योगपतींकडून पैसे घेऊन खाजगीकरण लोकांच्या माथी मारून पुन्हा उद्योगपतींनाच श्रीमंत करण्याचे धोरण सरकारने बदलावे… याउलट सरकारने हा मंडळांकडे करोडोच्या रूपात असलेला पैसा विकासकामांसाठी गणपती मंडळांकडून घेऊन गणपती मंडळांना श्रीमंत करावे… त्यातून अनेकांना रोजगारही मिळेल… सध्या सरकार हिंदूंचे आहे… आणि गणपती मंडळवालेही हिंदू आहेत… मात्र सरकार हिंदूंचे दिसत असले तरी ते सर्वसामान्य हिंदूंचे सरकार नाही… या तथाकथित हिंदू सरकारला सर्वसामान्य शेतकरी-बहुजन समाजातील हिंदूंना श्रीमंत करायचे नाही… तर आपल्या शेठजी उद्योगपती मित्रांना श्रीमंत करायचे आहे… त्यामुळे ते सर्वसामान्य हिंदूंचा फक्त आपल्या राजकारणासाठी वापर करतात… हे त्रिवार सत्य आहे…           …असो तर आता पुढचा मुद्दा म्हणजे गणपती उत्सवातून भटजी म्हणजेच पुजाऱ्यांना मिळालेले उत्पन्न किती?… याबाबत काही वर्षांपूर्वी मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसेपाटील आणि त्यांच्या टीमने गणपती उत्सवातून भटजी आणि तत्सम लोकांना मिळणारे उत्पन्न जाहीर केले होते… सोशल मीडियावर याबाबत माहिती देण्यात आली होती… ढोबळमानाने मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल मनपा, उरण, रायगड, कोकण आदी भागातील गणपतींची संख्या १ लाख धरल्यास… पूजेची दक्षिणा २ हजार किंवा १ हजार धरली… तर एका दिवसाचे पैसे होतात २ हजार प्रमाणे २० कोटी… आणि १ हजार प्रमाणे १० कोटी… यंदा सार्वजनिक गणपती ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर असे ११ दिवसांचे होते… २ हजार प्रमाणे २ अब्ज २० कोटी रुपये होतात… १ हजार प्रमाणे १ अब्ज १० कोटी रुपये… अबब… हा एवढा पैसा १० ते ११ दिवसात भटजी आणि पुजाऱ्यांना मिळतो… नो जीएसटी, नो व्हॅट, नो एनी इन्कमटॅक्स… यामध्ये  घरगुती गणपती, गणपती निमित्त बांधण्यात येणाऱ्या पूजा आदी धरलेल्या नाहीत… उर्वरित महाराष्ट्र आणि देशातील गणपतीही यात धरलेले नाहीत… धार्मिक विधीतून अब्जो रुपये मिळत असतील तर ते सर्व वर्गातील प्रतिनिधींना मिळाले पाहिजेत… हिंदू धर्मात जात ही बाब अनिवार्य असल्याने हिंदू धर्मात सर्व जातीतील पुजारी आवश्यक आहेत… त्यांना धार्मिक विधींचा अधिकार मिळाला पाहिजे… तरच समाजातील आर्थिक विषमता काही प्रमाणात कमी होईल…             एकीकडे शेतकरी आत्महत्या करताहेत तर दुसरीकडे देवाधर्माच्या नावावर करोडो रुपयांची उलाढाल होत आहे… जो खरा देव शेतकरी आहे तोच संपताना दिसत आहे… त्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या रोखणे लालबाग राजाच्या हाती आहे… या मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी… लिलावात आणि उत्सव काळात राजाच्या चरणी आलेले सर्व दान हे लोकोपयोगी आणि समाजकार्यासाठी वापरण्यात येईल… भाविकांचे दान पुन्हा भाविकांकडे समाजकार्यातून सुपूर्द केले जाईल… असे जाहीर केले आहे… त्यानुसार लालबागचा राजा मंडळाने शेतकऱ्यांना ते मदत करीत असले तरी यंदा मोठी भरीव मदत करावी… जेणेकरून भविष्यात कोणी शेतकरी कर्जापायी आत्महत्त्या करणार नाही… सामाजिक कार्यकर्त्यांचे हे नम्रपणे आवाहन आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments