चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
धनगर जमातीला अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र शासन निर्णय घेऊन तसे दाखले वितरीत करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा… यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि. २३ सप्टेंबर रोजी धनगर समाजाने पालीफाटा खोपोली येथे रास्ता रोको आंदोलन केले… १९५६ साली अनुसूचित जातीच्या यादीत धनगड जमात दाखल झाली…त्यामुळे मूळ धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहिला…धनगड जमात ही १९५६ पूर्वी पासून व आज देखील अस्तित्वात नाही… हे राज्यसरकारच्या वतीने न्यायालयात देखील स्पष्ट केले आहे… त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करावा, धनगर समाजाला संविधानाच्या कलम ३४२ (१) नुसार मान्यता मिळाली…पंढरपूर व लातूर येथे उपोषणाला बसलेल्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकार आमच्या बाजूने आहे, पण शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजचा रास्ता रोको आंदोलन केल्याचे हभप डॉ.अण्णासाहेब बाचकर यांनी सांगितले… यावेळी अनेक समाजबांधव उपस्थित होते…यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता… सरकारच्यावतीने मंडळ अधिकारी भरत सावंत यांनी निवेदन स्वीकारले…