जळगाव शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार ):-
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी निशा जाधव या बौद्ध समाजाच्या आहेत…अतिशय प्रामाणिक व निस्वार्थीपणे त्या आपल्या कर्तव्य पार पाडत असताना दलित व बौद्ध समाजाचे असल्याने त्यांना हेतू पुरस्कार त्रास दिला जात आहे…निशा जाधव या बौद्ध समाजाच्या उच्च अधिकारी असल्याने येथील मंडळींना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जणू काही पोटशूळ उठला आहे की काय?असे यावरून सिद्ध होते. केंद्रीय मंत्री ना.रक्षा खडसे यांनी अचानकपणे कसलेही पुरावे नसताना बौद्ध समाजाच्या एका दलित अधिकारी महिलेची लाज काढली त्यांना अपमानित करत भ्रष्टाचाराचा आरोप लावला…शिवाय निलंबनाची धमकी देत त्यांना बाहेर काढून पंचायत समितीला लॉक लावले.केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ज्या संविधानिक पदावर आहेत… त्या असे शासकीय कार्यालयाला लॉक लावू शकतात का? असा सवाल ऑल इंडिया पँथर सेनेचे भाई दीपक केदार यांनी यावेळी केला…पुरावे नसताना भ्रष्टाचाराचे आरोप करतात…ही बाब अत्यंत गंभीर व लांच्छनास्पद असल्याचे ते म्हणाले…