Friday, November 22, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडनवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळाची बैठक...नवरात्रौत्सव कालावधीत आचारसंहिता लागण्याची शक्यता... 

नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळाची बैठक…नवरात्रौत्सव कालावधीत आचारसंहिता लागण्याची शक्यता… 

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):- 

आगामी नवरात्र उत्सव २०२४ निमित्त सार्वजनिक नवरात्री मंडळांच्या अध्यक्ष,पदाधिकारी आणि गाव पोलीस पाटील यांची बैठक खालापूर पोलीस ठाण्यात आयोजीत करण्यात आली होती…या बैठकीला वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी उपस्थित मंडळ पदाधिकारी यांना नवरात्रौत्सव साजरा करण्याविषयी मार्गदर्शन केले…  यावेळी नवरात्रौत्सवात गरबा खेळताना महिला व मुली यांची छेडछाड असे प्रकार घडू नये,महिलांची सुरक्षितता अतिशय महत्वाची असून सर्व बाबी कायद्याच्या चौकटीत राहून करा,असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी खालापूर विक्रम कदम यांनी केले…सर्व मंडळांनी ऑनलाईन व संबंधित विभागांची परवानगी घ्यावी आणि मूर्तीची सुरक्षा करण्यासाठी खास स्वयंसेवक नेमाव्यात…मूर्ती व मंडप परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत…कायदेशीर विद्युत पुरवठा घ्यावा आणि त्याची सुरक्षितता तपासून पाहणे, जाती धर्मात तेढ निर्माण होईल असे बॅनर,देखावे किंवा चित्रफित निर्माण करु नये,गरबा खेळताना बिभस्त व आक्षेपार्य गाणी लावू नये, गरबा खेळताना मुली महिला यांचा विनयभंग होणार नाही याची दक्षता घ्यावी,डिजे अथवा डॉल्बी वापरू नये, ध्वनीक्षेपन परवानगी घ्यावी,दिलेल्या वेळेचे पालन करावे,आवाज नियंत्रण करणे,मिरवणूक व विसर्जनावेळी योग्य ती उपाय योजना करण्यात यावी…३ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या नवरात्रौत्सव कालावधीत आगामी विधानसभा निवडणूक आचार संहिता लागण्याची दाट शक्यता असल्याने नवरात्रौत्सव मंडळांना अनेक बाबींवर निर्बंध लागण्याची शक्यता आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments