महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाड पोलीस वसाहतीमधील झाडीझुडपे तसेच अस्वच्छ परिसर पोलीस परिवारांनीच पुढाकार घेऊन स्वच्छ करून समाजाला पर्यावरण व निसर्गप्रेमाचे उत्तम उदाहरण दिले आहे…स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला यातून कान पिचक्या देण्यात आल्या आहेत…शनिवार दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहरातील नवेनगर येथील नवीन पोलीस वसाहतीतील सर्व पोलीस परिवार सदस्यांनी आपल्या वसाहतीचा संपूर्ण परिसर श्रमदानाने स्वच्छ केला… आगामी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ही साफसफाई करण्यात आली …या वसाहतीत जवळपास 100 पोलीस परिवार राहत आहेत… ही वसाहत शहराच्या प्रारंभी व शेती परिसरात असल्याने झाडी झुडपे वाढण्याचे प्रमाण या ठिकाणी जास्त आहे…त्याचप्रमाणे अस्वच्छतेमुळे डास,उपद्रवी कीटक, सरपटणारे जीव व अन्य प्राण्यांचा वावर देखील मोठा आहे… सध्या कोयता गॅंगची समाजात चर्चा आहे…स्वच्छतेसाठी पोलिसांनी कोयता हाती घेतल्याने… या कोयत्याचा वापर पोलीस गॅंगने म्हणजेच समूहाने स्वच्छतेसाठी केला…एखादया वस्तूचा ज्या कामासाठी वापर होतो त्यावरून त्याचा दर्जा ठरतो…कोयता चांगल्या कामासाठी वापरल्यास त्यातून स्वच्छता निर्माण होते…मात्र वाईट कामासाठी वापरल्यास त्यातून गुन्हेगारी निर्माण होते…पोलिसांनी कोयता हाती घेऊन समाजापुढे पर्यावरण व निसर्ग रक्षणाचे काम केले… या स्वच्छता अभियानात डीवायएसपी शंकर काळे यांच्या समवेत तालुका पोलीस निरीक्षक श्री.सानप,महाडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव, श्री पाटील,श्री. कांदे, श्री खाडे यांसह सर्व पोलीस कर्मचारी, महिला पोलीस त्याचप्रमाणे पोलिसांचे सर्व कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते… सर्व सदस्यांनी शंकर काळे यांनी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे विशेष कौतुक केले.