नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ):-
पनवेल मनपा हद्दीतील खारघर बेलपाडा सेक्टर-३ येथील भुयारी मार्गाजवळील गटाराच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे… गटारात पाणी असतानाच काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे… गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी दिवसाढवळ्या रस्त्यावर सोडण्यात येत असल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे …
खारघर बेलपाडा सेक्टर-३ येथील भुयारी मार्गाजवळील गटाराचे काम तकलादू पद्धतीने केले जात आहे… दिवसाढवळ्या हे काम सुरु असून ठेकेदार थुंक लावण्याचे काम करीत आहे… पनवेल मनपा कार्यालयातील अधिकाऱ्यांचे या कामावर नियंत्रण नसल्याचे दिसत आहे…सदर गटार तुंबत असल्याने नवीन पद्धतीने बांधकाम करण्यात येत आहे… मात्र हे बांधकाम संशयास्पद आहे… गटारातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी दिवसाढवळ्या रस्त्यावर सोडण्यात येत असल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे… गटारातील दुर्गंधयुक्त पाणी पंपाने काढण्यात येऊन ते एखाद्या बंधिस्त गटारात न सोडता रस्त्यावर सोडण्यात येत असल्याने लोकांना त्याचा त्रास होत आहे… या परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे… भुयारी मार्गाजवळून सतत वाहनांची वर्दळ सुरु असते… एनएमटी,बेस्ट,खाजगी वाहने,रिक्षा या तळोजा जलवायूपर्यंत जात असल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याचा फवारा लोकांच्या अंगावर उडविला जात आहे…
ब्रेकिंग न्यूज म्हणजे पूर्वीच्या गटाराची दुरुस्ती करताना ते गटार पूर्णपणे सुकविणे गरजेचे आहे… त्यांनतर तेथे पीसीसी करून वर काँक्रिटीकरणाचे काम करणे आवश्यक आहे… मात्र येथे गटारात पाणी असतानाच त्यात मोठी खडी टाकून वर सिमेंटचा थर दिला जात आहे… हे काँक्रिटीकरण पाण्यात वाहत जाऊन निकृष्ट दर्जाचे काम होत आहे… महानगरपालिकेचे कोण अधिकारी ? यावर देखरेख करीत आहेत … त्यांची उपस्थिती कामाच्या ठिकाणी नाही.. त्यामुळे असे तकलादू काम करून लाखो रुपयांचा निधी लाटण्याचे काम होत आहे… दिवाळीआधी पनवेल मनपाचे दिवाळे काढण्याचे काम मनपा अधिकारी आणि ठेकेदाराच्यावतीने सुरु आहे…