मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहार):-
राज्यातील विधानसभा निवडणुकांची बिगुल पुढील आठवड्यात वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आज गुरुवार दि. १० ऑक्टोबर रोजी महायुती सरकारच्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक आज संपन्न झाली. याबैठकीत जवळपास 80 निर्णय घेण्यात आले असून छोट्या छोट्या समाजांसाठी नव्याने महामंडळाची खैरात वाटण्यात आली… मराठा समाजाला राजकीय शह देण्यासाठी ही खेळी करण्यात आल्याची चर्चा आहे… गुजर, लेवा पाटील, शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी, लोहार, नाथपंथी समाजासाठी तसेच पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळे स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे… संत गोरोबा कुंभार महामंडळ व कोळी समाज महामंडळाचा प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली… ब्रेकिंग न्यूज म्हणजे स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या भाजपा, शिंदे, पवार सरकारने मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे…