नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
आज शुक्रवार दि . ११ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवर वायुदलाच्या लढाऊ विमानाचे यशस्वी लँडिंग झाले… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही पहीली चाचणी यशस्वीरित्या पार पडली. नवी मुंबई विमानतळाच्या पूर्णपणे तयार झालेल्या पहिल्या धावपट्टीवर भारतीय वायूदलाचे सी-२९५ हे विमान उतरले. हे लढाऊ विमान विमानतळ व नवी मुंबईच्या आकाशात काही वेळ घिरट्या घेत होते… त्यानंतर धावट्टीवर यशस्वीरित्या उतरले. धावपट्टीच्या बाजूने पाण्याचे फवारे उडवून या विमानाला मानवंदना देखील देण्यात आली. २०२५ पर्यंत या विमानतळावरून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होईल, असे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे…
हवाई दलाचे सूखोई विमान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन होते. यासाठी सिडकोने पंतप्रधान कार्यालयाकडे वेळही मागितली होती. परंतु, पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींची वेळ न मिळाल्याने महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.अजून अनेक चाचण्या विमानतळावर यापूढे चालूच राहणार असून या चाचण्यांच्या अहवालानंतर प्रत्यक्षात विमानतळ वापरासंदर्भातील परवानग्यांसाठी हालचाली सूरु होणार आहेत.