Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभेची आचारसंहिता उद्या लागण्याची दाट शक्यता... निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन करणार...

विधानसभेची आचारसंहिता उद्या लागण्याची दाट शक्यता… निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन करणार घोषणा…

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

लोकसभा निवडणुकीत झालेल्या जोरदार राजकीय संघर्षानंतर संपूर्ण राज्याला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत…राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत…कारण आधीच लांबलेली विधानसभा निवडणूक कधी लागतेय याकडे सर्वाच्या नजरा लागून राहिल्या आहेत…पण आचारसंहिता कधीपासून लागू होईल यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे… सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसाच्या आत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे…विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते…उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे…मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या असून सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत…रविवारी सुट्टी असतानाही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी करण्यात आले आहे…आगामी विधानसभा निवडणूक ही अटीतटीची असणार आहे…महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीने ही चांगलीच कंबर कसलीय…त्यामुळे थेट लोकांशी संबंधित असलेल्या योजना सुरु करण्याचा धडाका महायुती सरकारने लावलाय. मात्र कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते.  म्हणून मागील  आठवड्यात  दोन दोन मंत्रीमंडळ बैठका होताना पाहायला मिळत आहे… मंत्रिमंडळ बैठकीत अधिक निर्णय घेतले जात आहेत…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments