माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
नवरात्र हा संपूर्ण भारतात नऊ दिवस साजरा केला जाणारा चैतन्यमय आणि आनंददायी सण आहे. हा सण, देवी दुर्गाला समर्पित आहे…जो भक्ती,प्रार्थना आणि नृत्य करून साजरा केला जातो…गरबा सादर करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात…हा एक पारंपारिक नृत्य तालबद्ध टाळ्या आणि दांडियाच्या काठ्यांचा वापर करून केले जाते…नवरात्री दरम्यान उत्साही वातावरण विविध समुदायांना एकत्र जवळ आणते, कारण ते एकत्र येऊन सण उत्साहाने साजरा करतात… रायगडातील असेच एक राजकीय कुटुंबीय सध्या दांडियाचा आनंद घेत आहे… हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे… या व्हिडिओमध्ये तटकरे कुटुंबीय भव्य गरबा रात्रीचा आनंद घेत आहेत…यामध्ये महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे,अनिकेत तटकरे, त्यांची पत्नी हे सर्वजण गरबा-दांडीया खेळताना दिसत आहे…हा नवरात्रोत्सव कार्यक्रम रोह्यात झाला…तटकरे कुटुंबाचे सांस्कृतिक परंपरा आणि सणांवर असलेले प्रेम दिसून आले…भव्य आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचा त्यांचा आनंद आणि उत्साह संपूर्ण उत्सवात दिसून आला.
Home पनवेल / उरण / रायगड नवरात्रौत्सवात दांडिया खेळण्याची आगळी वेगळी परंपरा… दांडियाच्या तालावर थिरकले तटकरे कुटुंबीय …