महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
राज्यासह कोकणात विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहे…महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी रंगतदार लढत पाहावयास मिळणार आहे…कोकणातील महायुतीच्या पहिल्या बैठकीची सुरुवात महाडमध्ये झाली…या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार गोगावले यांनी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार याबद्दल कोणतीच शंका नसल्याचे स्पष्ट करून कोकणातील ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महायुतीचे आमदार विजयी होणार असून त्यासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्रितपणे काम करणार आहेत…तसेच रायगड जिल्ह्यातील ७ जागांवर महायुतीचे शिलेदार विजयी होणार असून महायुतीतील घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय असल्याचे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले…२० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुती पक्ष सज्ज झाला असून कोकणातील ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह रायगड जिल्ह्यातील ७ जागांवर माहितीचेच उमेदवार निवडून येणार…असा ठाम विश्वास महाडचे आमदार भरत गोगावले यांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले…
लोकसभेप्रमाणे विधानसभेला महायुतीतील घटक पक्ष एकत्र असून सर्व पक्ष ताकतीने प्रचारात उतरणार असून लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये महायुतीचे आमदार निवडून आणण्यासाठी मित्रपक्ष सर्वजण ताकतीने सज्ज झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले…महायुती सरकारमधील मागील दोन वर्षात महाडमध्ये केलेल्या विकासकामांचा फायदा विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना होईल असे सांगून महायुतीचे उमेदवार भरत गोगावले हे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून चौकार मारणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे बिपिन म्हामुणकर यांनी सांगितले…यावेळी बैठकीत शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजपा पक्षाचे महाड, पोलादपूर व माणगाव या तिन्ही तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते…