Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडशीख समाज,अल्पसंख्याक समाज शिवसेनेत...शिरीषदादांच्या उपस्थितीत झाला जम्बो पक्षप्रवेश... 

शीख समाज,अल्पसंख्याक समाज शिवसेनेत…शिरीषदादांच्या उपस्थितीत झाला जम्बो पक्षप्रवेश… 

खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून पनवेल विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पावलोपावली शुभसंकेत मिळत आहेत…पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन शिवसेना जिल्हाप्रमुख  शिरीषदादा घरत यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना खारघर शहर प्रमुख  गुरु गोमा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने खारघर ओवे शीख समाज व अल्पसंख्या समाज यांनी मोठ्या प्रमाणात महिला -पुरुषांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला…शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी हा जम्बो पक्षप्रवेश शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे झाला… येथील  दलविंदर सिंह, नरेंद्र सिंह, राघवीर सिंह, मेहिज शहाजापुरवाला, महमद कडिर हनिफ मोनिया, दशरथ भातोसे, विनोद म्हात्रे, संध्या गोवर्धन, जासिबून खान, जैतून खान, लता जाधव, हुसणार खान यांच्यासह  शेकडो महिला व पुरुषांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला…

यावेळी रायगड जिल्हाप्रमुख शिरीषदादांसह उपजिल्हाप्रमुख भरत पाटील,महानगर समन्वयक दिपक घरत, तालुका प्रमुख संदीप तांडेल, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल,  महानगर संघटक डी.एन. मिश्रा, युवासेना सहसचिव अवचित राऊत, खारघर शहर संघटक अनिल पाटील, विभाग प्रमुख अनिल तळवणेकर, उत्तम मोर्बेकर, मनीष पाटील, विभाग समन्वयक संजय कानडे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटीका सौ. रेवती सकपाळ, विधानसभा संघटीका सौ. सुजाता कदम, तालुका संघटीका सौ. अनिता डांगरकर, उपमहानगर संघटिका सौ. रूपाली कवळे, शहर संघटीका सौ. संपदा धोंगडे, सौ. रेखा शर्मा यांच्या सह शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित  होते…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments